संक्षिप्त टिप्पणी
पंचायत समिती विक्रमगड
जिल्हा परिषद पालघर.
प्रस्तावना
विक्रमगड तालुका हा पालघर जिल्हाचा मध्यवर्ती ठिकाणी असुन त्याची निर्मिती सन 26 जानेवारी 2002 रोजी झाली. बहुतांशी लोकसंख्या आदिवासी आहे. या तालुक्याचा बराचशा भाग जंगलव्याप्त डोंगराळ द-या खो-याचा आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 55037 चौ.कि.मी. असुन त्यापैकी 20759 हेक्टर क्षेत्र लागवडीलायक आहे. तालुक्यात सरासरी 2500 ते 3000 मी.मी. पर्जन्यमान आहे. पर्जन्यमान आहे. या तालुक्यात एकूण 95 गांव व 43 ग्रामपंचायती असुन सन2011 च्या जनगणेनुसार एकूण 1,37,625 इतकी आहे. त्यामध्ये पुरुष 69,136 व स्त्रिया- 68.489 एवढी आहे.
विक्रमगड हे ठिकाण पालघर जिल्हातील नव्याने अस्तित्वात आलेले तालुक्याचे ठिकाण आहे. पूर्वेला जव्हारचा घाट, सहयाद्रीच्या रांगातील वतवडयाचा सुळका दिसतो. नैऋत्येला कोहोज किल्ला दिसतो. विक्रमगड तालुक्याच्या पश्चिमेस पालघर जिल्हा व वायव्येला डहाणू तालुका आहे. दक्षिणेस वाडा तालुका आहे.
महालक्ष्मी डोंगराच्या अलिकडे व पूर्व पश्चिम पहुडलेला मातेरा डोंगर दिसतो. या डोंगराच्या सखल भागात देहजें खो-यात वसलेले विक्रमगड हे तालुक्याचे ठिकाण आहे. विक्रमगड तालुक्यात उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तिन्हीही आऋतू प्रामुख्याने प्रकर्षाने जाणवतात. जुन जुलै व ऑगस्ट या महिन्यामध्ये पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणवर होते. या तालुक्यांतील भात शेती प्रमुख पीक असुन संपूर्ण शेती ही पावसाच्या पाण्यावर अंवलबुन आहे. भात शेती बरोबरच डोंगराळ भागात नागली, वरई व खुरासणी इत्यादी पिके घेतली जातात.
पुर्वीच्या जव्हार संस्थांनातील कारभारामध्ये विक्रमगडला कुडाण असे नांव होते. कुडाण हे गांव त्याकाळी सरहद्यीचे परकीयांना अटकाव करणारे संरक्षण भिंतीप्रमाणे कार्य करत होते. असे या कुडाण गांवामध्ये संस्थांनाधिपती विक्रमशहा महाराज यांनी आले पुर्वीचे ठाणे मलवाडा येथे स्थलांतरीत केले त्यामुळे कुडाण या गांवाला विशेष महत्व प्राप्त झाले.
जव्हारचे नरेश यशवंतराव महाराज यांच्या वाढदिवसाचे अवचित साधुन दिनांक 10 डिसेंबर 1947 रोजी कुडाण या पालघरचे विक्रमगड असे नामकरण केले. विक्रमगड मधील पिंजाळ नदीवरील श्री. पंतगेश्वराचे महादेव मंदिर प्रसिध्द आहे. पांडव कालीन श्री नागेश्वर मंदिर हे शिवमंदिर प्रसिध्द आहे. जांभे गांवाजवळ पलुचा धबधबा प्रसिध्द आहे.
विक्रमगड तालुक्यामध्ये मोठयाप्रमाणा मध्ये आदिवासी, कोकणा, कुणबी, वारली, ठाकुर, महादेव कोळी, मल्हार कोळी, डोरकोळी व कातकरी इत्यादी जाती जमातीचे लोक रहातात. विविध जाती जामातीचे लोक रहात असले तरी सर्वामध्ये सामाजिक एक्य आहे.
पंरपरागत सण, उत्सव व समारंभ इत्यादी मध्ये सर्वजण गुण्यागोंविदाने राहतात. पेथील आदिवासी तारपानृत्य विशेष प्रसिध्द असून वारली चित्रकला विशेष लक्षवेधक आहे. विविध राजकिय पक्ष असलेतरी पक्षामध्ये (राजकीय) सामाजस्य असुन सामाजिक प्रश्नावर राजकिय पक्ष एकत्र येतात.
विक्रमगडची सांस्कृतिक परंपरा म्हणजे तारपानृत्य व डोल नाद होय. दसरा या सणाला सर्व आदिवासी आपआपल्या गांवात तारपानृत्य करीत असतात. विविध देवदेवतांचे मुखवटे घालून रात्र जागविणारे लोकांचे व निकल मनोरंजन करणारे बोहाडा हे पंरपरागत चालत आलेल्या उत्सव आहे. नवरात्र उत्सव, दहीहंडी, राष्ट्रीय सण व लग्न सोहळामध्ये सांस्कृतिक प्रतिबिंब दिसुन येते.
दर वर्षी त्र्यबँकेश्वर येथे वारकराचे दिडया विक्रमगड तालुक्यातील खेडयापाडयातुन निघतात विविध नेत्यांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साज-या केल्या जातात.
विक्रमगड तालुक्यांत प्रामुख्याने रस्ते वाहतुक मोठ्या प्रमाणावर चालते. बहुतांशी गांवे पक्या रत्याने जोडल्या आहेत. तरीही आद्याप पाडे वस्त्या या रत्यापासून वंचित आहेत. दळण वळणासाठी प्रामुखांने, बैलगाड्या, जीप, टूक व बस यांचा वापर केला जातो.
भौगोलिक दृष्ट्या विक्रमगड तालुक्याचे स्थान पुर्वेस जव्हार, पश्विमेस पालघर, दक्षिणेस वाडा आणि उत्तरेस डहाणू या तालुक्याच्या सिमा आहेत. तसेच पश्चिमेस साधारण 45 कि.मी. अंतरावर अरबी समुद्राचा किनारा आहे. विक्रमगड तालुक्यातुन मुख्यता देहर्जे, पिंजाळ, सुर्या आणि राखाडी नद्यांचा प्रवाह वाहत असुन सुर्या नदीवर धामणी व कवडास धरणांची कामे झालेली असुन घामणी येथे सुर्या जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे.
सिमालगत असणा-या वाडा, जव्हार, डहाणू तालुक्याशी, त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्याशी दळणवळणाच्या दृष्टीने जोडणारे राज्य मार्ग असुन राज्य मार्ग परिवहन महामंडळ मार्फत बस सेवेची सुविधा पुरविण्यात येते. तसेच खाजगी जीप व इतर वाहनांची सुविधाही उपलब्ध आहे. तसेच महाराष्ट्र-गुजरात राज्यांना जोडणारा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग साधारण 22 कि. मी. अंतरावर आहे. तर रेल्वे प्रवासाच्या दृष्टीने किंवा वहातुकीच्या दृष्टीने नजिकचे रेल्वे स्टेशन पालघर असुन साधारण 40 कि.मी. अंतरावर आहे.
विक्रमगड तालुक्याचा बहुतांश गुप्रदेश हा समतल असुन जमिन मुख्यता जांभ्या खडकापासुन बनलेली आहे. तालुक्यातील मौजे जांगे या गावाजवळ मुख्यालयापासुन 08 किमी अंतरावर नैसर्गिक पल्लुचा धबधबा असुन पावसाळयाच्या दिवसात पर्यटकांची ब-यापैकी वर्दळ असते. तसेच मुख्यालयापासुन 16 किमी अंतरावर मौजे कावळे या ठिकाणी श्री पिंजाळेश्वर हे शिव मंदीर असुन प्रशस्त मठाचे बांधकाम
करण्यात आलेले आहे. जेणे करुन भाविकांची त्याठिकाणी उत्तमप्रकारची सोय होते. तर 02 किमी अंतरावर मौजे नागझरी येथे श्री नागेश्वर महादेव मंदीर आहे.
मौजे हातणे या ठिकाणी एका संस्थेमार्फत वैद्यकिय सेवेच्या दृष्टीने रिव्हेरा हॉस्पिटल उभारण्यात आलेले असुन तज्ञ वैद्यकिय अधिका-यामार्फत औषधोपचार व सर्जरीची सोय उपलब्ध आहे. तसेच मौजे भोपोली येथील ढवळे मेमोरियबल ट्रस्ट मार्फत आदिवासी समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने कृषि, शिक्षण, आरोग्य व इतर विभागाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. तसेच बायफ संस्थेमार्फतही कृषि विकासाच्या अनुषंगाने उपक्रम राबविण्यात येतात. तालुक्यातील शेतजमिन सुपिक व सपाट असल्याने शेती व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशिर असुन मुंबई सारखे शहर नजिक असल्याने फुलशेती / भाजीपाला पिकांची लागवड दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे विक्रमगड तालुका विकसनशिल टप्प्यात आहे असे म्हणता येईल.
या तालुक्यांत प्रामुख्याने शेती व्यवसाय मोठ्याप्रमाणात उदरनिर्वाह चालविला जातो. औद्योगिक विकास (कारखानदारी) चा विकास आजिबात झालेला नाही.
विक्रमगड तालुक्यात ग्रामीण रुग्णालय विक्रमगड येथे असुन वेगवेगळ्या केंदामधुन खालील प्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व पथक आहेत. उटावली, मलवाडा, कुझे, तलवाडा, धामणी, बोरांडा या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध शाळांना पुरविल्या जातात.
विक्रमगड परिसर हा आदिवासी बहुल असुन येथिल समाज आर्थिक/सामाजिक दृष्ट्या पाहिजे त्या प्रमाणात विकसित झाल्याचे दिसुन येत नाही. त्यामुळे या भागाचा विकास होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन अधिसुचना आर.ई.एन. 2799/ प्र.क्र. 82/म.10/ दिनांक. 13.06.1999 अन्वये विक्रमगड तालुका दिनांक 26.06.1999 पासुन कार्यान्वित झालेला आहे.
विक्रमगड तालका दिनांक 01.05.2014 पूर्वी ठाणे जिल्ह्यामधे समाविष्ट होता. परंतु तद्नंतर नवनिर्मित पालघर जिल्ह्यची निमिर्ती झाल्यानंतर विक्रमगड तालुक्याचा समावेश पालघर जिल्ह्यात करण्यात आलेला आहे.