प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) wcd

  • उद्देशः
    • गरोदरपणात आणि बाळंतपणात महिलांना आरोग्य सेवा-सुविधा आणि प्रोत्साहनाच्या माध्यमातून कुपोषणाचा प्रभाव कमी करणे.
    • माता व बाल आरोग्य सुधारणे.
  • लाभार्थीः
    • पहिले बाळ मुलगा किंवा मुलगी असलेली व दुसरे बाळ मुलगी असलेली महिला जी खालीलपैकी कोणत्याही एका निकषात बसत असेल अशी महिला पात्र आहे.
      1. ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष रु. 8 लाखापेक्षा कमी आहे.
      2. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला.
      3. पात्र लाभार्थी ज्यांच्याकडे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत रेशन कार्ड उपलब्ध आहे.
      4. ज्या महिला अंशतः (40 टक्के) किंवा पूर्ण अपंग आहेत (दिव्यांग जन)
      5. बी.पी.एल. रेशनकार्ड असलेली महिला.
      6. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत महिला लाभार्थी.
      7. ई-श्रम कार्ड असलेली महिला.
      8. किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी
      9. मनरेगा जॉब कार्ड असलेली महिला.
      10. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा सेविका
    • लाभाचे स्वरुपः
      • पहिल्या अपत्यासाठी :
        • पहिला हप्ता – रु.3,000/- : 6 महिन्यांच्या आत राज्य शासनाकडून मान्यता प्राप्त दवाखान्यात गरोदरपणाची नोंदणी. किमान एक बाळंतपणापूर्वी तपासणी करुन घेणे आवश्यक.
        • दुसरा हप्ता – रु.2,000/- : बालकास पेंटा – 3 पर्यंतचे प्राथमिक लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. (14 आठवड्यांपर्यंत)
      • दुसऱ्या अपत्यासाठी – (मुलगी असेल तर) एक रकमी रु. 6,000/-जन्म दाखला असणे आवश्यक व बालकाचे पेंटा 3 पर्यंतचे (14 आठवडे) लसीकरण झालेले असणे आवश्यक
    • आवश्यक कागदपत्रेः
      • लाभार्थीचे आधार कार्ड
      • गरोदरपणाचे नोंदणीचे कार्ड, बाळाचे लसीकरण कार्ड
      • लाभार्थीचे आधार कार्ड जोडलेले व DBT स्नेही बँक खाते
    • माहिती, अर्ज व मदतीसाठी संपर्कः
      • आपल्या जवळच्या आशा सेविका, आरोग्य सेविका,
      • अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधा.
      • जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा.
      • अधिक माहितीसाठी 14408 या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर फोन करा.