योजने बद्दल माहिती :
| अ.क्र. | जि.प. सेस फंड योजनेचे नाव | प्रारुप |
|---|---|---|
| १ | किडरोगांचे नियंत्रण | किडरोग नियंत्रणासाठी रासायनिक व जैविक कीटकनाशके / बुरशीनाशके व तणनाशके इ. खरेदीकरीता अनुदान देणे |
| २ | शेतकऱ्यांना पीक संरक्षण अवजारे, साहित्य व इतर बाबी पुरवठा | विविध पीक संरक्षण अवजारे व तार कंपाउंड करीता अनुदान देणे |
| ३ | शेती उपयोगी साहित्य व सुधारित कृषि अवजारे / कृषि प्रक्रिया उद्योगाकरिता साहित्य पुरवठा | हस्तचलित व स्वयंचलित सुधारित कृषि अवजारे (उदा. मळणी यंत्र, ताडपत्री, गवत कापणी यंत्र, चाफकटर, काजू प्रक्रिया यंत्र, दातेरी विळे, नारळ झावळा कापणी यंत्र, HDPE/PVC पाईप, शेडनेट, मल्चिंग पेपर तसेच इतर मान्यताप्राप्त शेती उपयोगी सुधारित अवजारे व यंत्रसामुग्री) यासाठी ५०% अनुदान देण्यात येईल. |
| ४ | शेतीसाठी सिंचन साहित्य पुरवठा करणे | डिझेल/पेट्रोडिझेल, विद्युत, सौर पंप तसेच ठिबक सिंचन संच यावर ५०% अनुदान देण्यात येईल. |
| ५ | बायोगॅस बांधणीसाठी पुरक अनुदान देणे | बायोगॅस बांधणीकरीता पुरक अनुदान देणे |
| ६ | शेतकरी शिबिर, प्रात्यक्षिके व प्रदर्शने तसेच कृषि शैक्षणिक सहली आयोजित करणे | शेतकरी शिबिरे, प्रात्यक्षिके, प्रदर्शने तसेच शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे आयोजित करणे |
| ७ | शेतकऱ्यांना बियाणे संच पुरवठा करणे | भात, उडीद, तुर, हरभरा तसेच भाजीपाला मिनीकिट पुरवठा करणे |
| ८ | महिला किसान शक्ती पंख योजना (ड्रोन खरेदीकरीता अर्थसहाय्य) | महिला ग्रामसंघ/शेतकरी उत्पादक कंपनी यांना ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे कृषी सेवा देण्यासाठी सक्षम करणे, रसायनांचा अतिरेकी वापर कमी करणे, अचूक फवारणी आणि शाश्वत उपजीविका निर्माण करणे |
| ९ | कृषि प्रक्रिया संयंत्र खरेदीकरीता अर्थसहाय्य (सोलर ड्रायर) | हंगामी भाज्या व फळे वाळविण्यासाठी सोलर ड्रायर उपलब्ध करून देणे, शेतीमालाचे संरक्षण, नुकसान कमी करणे व उच्च प्रतीचा माल तयार करणे |
| १० | शेतीत बांबू लागवड करणे | शेतात/बांधावर/पडीक जमिनीवर बांबू लागवड करून उत्पन्न वाढविणे व शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देणे |
| ११ | कृषि क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरणासाठी अर्थसहाय्य | मजुरी खर्च कमी करणे, वेळ बचत करणे व उत्पादन वाढवण्यासाठी विविध कृषि अवजारे खरेदीसाठी अनुदान देणे |
| १२ | शेतकऱ्यांना सिंचनासाठी नवीन विहीर खोदकाम व बांधकाम करणे | नवीन विहीर खोदकाम, बांधकाम, जुनी विहीर दुरुस्ती व शेततळे अस्तरीकरणासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे |
| १३ | आधुनिक शेतीस प्रोत्साहन व नाविन्यपूर्ण योजना राबविणे | • लाकडी शिडी (Scaffolding) साठी प्रोत्साहन • मधुमक्षिका पालन व्यवसाय प्रोत्साहन • शेतकरी/शेतमजूर/बचतगट/शेतकरी उत्पादक गटांना भाजीपाला विक्री साहित्य पुरवठा • यांत्रिकीकरणास प्रोत्साहन • वेलवर्गीय भाजीपाला लागवडीसाठी मांडव बांधणीस अर्थसहाय्य • मशरूम लागवडीस अर्थसहाय्य |
लाभार्थी : सर्व घटकातील लाभार्थी अर्ज करू शकतात. लाभार्थ्यांकडे ७/१२, ८अ असणे आवश्यक आहे.
फायदे: शेतक-यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य ५०% अनुदानाने उपलब्ध करून मिळते. शेतक-यांना आधुनिक शेती करण्यास प्रोत्साहन मिळते तसेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पन्न वाढण्यास मदत होते.
अर्ज कसा करावा –
पंचायत समिती स्तरावर विहित नमुन्यामध्ये ऑफलाईन अर्ज सादर करावा. अधिक माहिती करीता तालुका स्तरावर – गट विकास अधिकारी/ कृषी अधिकारी/ विस्तार अधिकारी (कृषि) यांच्याकडे संपर्क साधावा.