जिल्हा जलसंधारण विभाग

विभाग प्रमुख

नाव – श्री.अजित जाधव
पदनाम –उपविभागीय जलसंधारण अधिकारी (प्रभारी )
ईमेल पत्ता- vikramgad.bdo@gmail.com
पत्ता- पंचायत समिती कार्यालय ,मेन रोड,,विक्रमगड हायस्कूल च्या बाजूला विक्रमगड,जि.पालघर 401605

व्हिजन आणि मिशन

जलसंधारण विभाग हा  पंचायत समितीच्या विक्रमगड  एकूण 14 विभागांपैकी एक विभाग आहे. जलसंधारण अधिकारी हे विभागाचे प्रमुख असतात. जलसंधारण विभागामार्फत 0 ते 100 हेक्टर्स सिचन क्षमतेच्या पाझर तलाव, गावतळे, को.प.बंधारे, सिमेंट नाला बंधारे बांधण्यात येतात. बिगर आदिवासी क्षेत्राचे नियोजन विभागामार्फत आदिवासी क्षेत्राचे नियोजन आदिवासी प्रकल्पामार्फत करुन कामे प्रस्तावीत करण्यात येतात.

उद्दिष्टे आणि कार्ये

  • गावतलाव बांधणे व सुशोभिकरण करणे गावाच्या जवळ नाल्यावरसर्व साधारणपणे 6.00 मी.उंचीचा मातीचा बांध बांधुन निर्माण केलेला जलसाठा म्हणजे गावतलाव.याचा उपयोग पाझरातुन विहीरींचे पुनर्भरण होणे व पशु-पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणे हा आहे.
  • सिमेंट कॉक्रिट बंधारे बांधणे/ दुरूस्ती करणे नदी नाल्यावर संधनाकातील बांधकामादृारे मान्सुनोत्तर पाणी आडवुन केलेला जल साठा म्हणजे बंधारायाचा उपयोग पाझरातुन विहीरींचे पुनर्भरण होणे व पशु-पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणे हा आहे.

संस्था

संलग्न कार्यालये –
प्रादेशिक जलसंधारण विभाग, ठाणे

संचालनालय / आयुक्तालय –
मृद व जलसंधाण विभाग